25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News नगरपालिका क्षेत्रात स्क्रब टायपसने राजेंद्र खंगार यांचा मृत्यू

नगरपालिका क्षेत्रात स्क्रब टायपसने राजेंद्र खंगार यांचा मृत्यू

0
33

गोंदिया,दि.26ः- गोंदिया नगरपरिषदेतंर्गत येत असलेल्या हनुमाननगर रिंगरोड निवासी राजेंद्र खंगार यांचा स्क्रब टायपसने उपचारादरम्यान आज बुधवारला सायंकाळच्या सुमारास नागपूर येथे मृत्यू झाला.खंगार यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने त्यांना उपचारासाठी 16 सप्टेंबरला हड्डीटोली परिसरातील डाॅ.गिरी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यादरम्यान त्यांच्या तपासण्या केले असता त्यांना स्क्रब टायपस झाल्याचे उघडकीस आले,तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नागपूरच्या क्रिटीकल केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु आज 26 सप्टेंबरला सायकांळी 6.30 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्यावर उद्या 27 सप्टेंबरला गोंदिया येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेच्यावतीने रिंगरोडपरिसरातील भागात स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने जिकडे तिकडे घाण व केरकचरा पडलेला असून किटकनाशष औषधांची फवारणी सुध्दा नगरपरिषदेच्यावतीने हनुमाननगर,शिवनगर,अवंती चौक,गजानन काॅलनी परिसरात मोठ्याप्रमाणात डासांचाही प्रभाव वाढलेला आहे.तर सांडपाणी वाहून जाणारी नाली नसल्याने तो सांडपाणी मोकळ्या जागेत साचत असल्याने परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात अस्वच्छतेचे प्रमाण बघावयास मिळते.