नागपुरात लवकरच विमानांची दुरुस्ती

0
13

नागपूर- मिहानला चांगले दिवस येत आहेत. एअर इंडियाने बोइंगच्या सहकार्याने मिहान-सेझ प्रकल्पामध्ये उभा केलेला विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करणारा ‘एमआरओ’ पूर्णत्वाला गेला आहे.
पुढील आठवडयात दिल्लीत होणा-या उच्चस्तरीय बैठकीत या ‘एमआरओ’च्या उद्घाटनाची तारीख ठरणार आहे.
आधीच हा ‘एमआरओ’ दोन वर्षे रखडला होता. देशात सत्तांतरानंतर या कामाला वेग आला आहे. सरकारी पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून, दिल्लीचे अधिकारी नुकतेच व्यवस्था पाहून गेले. सारे सुरळीत पार पडले तर येत्या मार्चच्या आत नारळ फुटलेला असेल.
विमानतळावर उतरलेले विमान एमआरओपर्यंत आणण्यासाठी ‘टॅक्सी वे’ची आवश्यकता असते. त्याचेही बांधकाम पूर्ण झाले आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचे महत्त्व या सोयी सुरू झाल्यानंतर वाढणार आहे. जगभरातील विमानांनी नागपूरचा वापर ‘इंधन थांबा’ म्हणून वापरावा अशी मिहान प्रकल्पामागील प्रेरणा साकार होताना दिसत आहे.