30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News तब्बल १२,११५ पोलिसांची पदे रिक्त

तब्बल १२,११५ पोलिसांची पदे रिक्त

0
24

blank

मुंबई – माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या प्रश्नातून महाराष्ट्रात पोलिसांची एकूण १२,११५ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी २,७०८ पदे ही पोलीस उपनिरीक्षकांची आहेत.

माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण ६,९५१ उपनिरीक्षक आहेत. महाराष्ट्रात उपनिरीक्षकाची ९,६५९ पदे आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या तीन जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण किती हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन आहेत ही माहिती गलगली यांनी विचारली होती. पोलीस दलात भरती धर्माच्या आधारावर होत नाही असे स्पष्टीकरण माहिती अधिकाऱ्यांनी दिले. पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी या पदांची लवकरात लवकर भरती व्हावी अशी अपेक्षा काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवली.

blank