गोंदिया जिल्ह्याची ०.९६ तर भंडारा जिल्ह्याची ६५ पैसे आणेवारी

0
15

गोंदिया जिल्हयात 13 तर भंडारा जिल्ह्यात 129 गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत

गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.03ः-जिल्हातील ९५५ गावापैकी तिरोडा तालुक्यातील फक्त १३ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या खाली असल्याने ही गावे दुष्काळग्रस्ताच्या यादीत आलेली आहेत.तर जिल्ह्यातील ३५ गावात पिक घेण्यातच आलेले नाही,त्यामध्ये २३ रीठी गावे असून १२ गावे ही बुडीत(धरणाखाली)क्षेत्रातील आहेत.गोंदिया जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही ०.९६ पैसे तर भंडारा जिल्ह्यात अंतिम आणेवारी ६५ पैसे दाखविली आहे. पिक नसलेल्या गावामध्ये गोरेगाव तालुक्यातील ५,तिरोडा-१,अर्जुनी मोरगाव -११,देवरी-७,सालेकसा-६ व सडक अर्जुनी तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे.आमगाव व गोंदिया तालुक्यातील सर्वच गावात पीक घेण्यात आल्याचेही म्हटले असून

यामध्ये गोंदिया तालुक्याती अंतिम आणेवारी १.३० पैसे,गोरेगाव ०.९५ पैसे,तिरोडा ०.७५ पैसे,अर्जुनी मोरगाव ०.७२ पैसे,देवरी १.०६ पैसे,आमगाव १.०७ पैसे,सालेकसा ०.९३ पैसे व सडक अर्जुनी तालुक्याची अंतिम आणेवारी ०.८७ पैसे काढण्यात आलेली आहे.गोंदिया तालुक्यातील १५३ गावापैकी १५३ गावांची आणेवारी ५० पैशाच्यावर आहे.गोरेगाव तालुक्यातील ९९ पैकी ९४ गावांची ,तिरोडा तालुक्यातील १२५ गावापैकी १११ गावांची,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १५९ गावापैकी १४८,देवरी तालुक्यातील १३५ पैकी १२८,आमगाव तालुक्यातील ८३ पैकी ८३,सालेकसा तालुक्यातील ९२ पैकी ८६ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १०९ पैकी १०४ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्यावर आहे.तर तिरोडा तालुक्यातील १३ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या खाली असल्याने या गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावामध्ये होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात ८८४ खरीप गावांपैकी ३९ गावे पिके नसलेली आहेत. त्यामुळे उर्वरित ८४५ गावांची आणेवारी घोषित करण्यात आली. ५0 पैसेपक्षा कमी आणेवारी असलेली १२९ गावे असून ५0 पैसेपेक्षा अधिक आणेवारी असलेली गावे ७१६ आहेत. मोहाडी तालुक्याची अंतिम आणेवारी ४९ पैसे दाखविण्यात आली असून या तालुक्यातील १0८ गावांपैकी ८१ गावे ५0 पैसेपेक्षा कमी तर २७ गावे ५0 पैशांच्या वर दाखविण्यात आले आहेत.

या सर्व परिस्थितीकडे बघता जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषीत करण्यासाठी धरणे,मोर्चे,निवेदने दिली ती निव्वळ राजकारणासाठीच म्हणण्याची वेळ आलेली आहे.कारण यावर्षी जिल्ह्यात शासकीय केंद्रावर झालेली धानाची खरेदी ही गेल्या अनेकवर्षापासूनचे रेकार्ड मोडणारी ठरली आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत १३६ कोटी रुपये असून आत्तापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. यंदा १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.त्यातच सरकारच्या छत्रपती कर्ज माफी योजनेचा लाभ  83 हजार 974 शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावा ही करण्यात येत आहे.भलेही आजपर्यंत खरेदी केेलेल्या धानावर बोनस दिला गेला नसला तरी शेतकरी तो मिळेल या आशेत आहे.