अँड. वसंतराव वैरागडे यांचे निधन

0
12

भंडारा,दि.03:जुन्या पिढीतील प्रसिद्ध विधीज्ञ अँड. वसंतराव आनंदराव वैरागडे (९0) रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी भंडारा यांचे बुधवारी दुपारी ३.३0 वाजता निधन झाले. ते जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगाचे सदस्य आणि नागपूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य होते. अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अँड. जयंत वैरागडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. श्रीकांत वैरागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत वैरागडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी 11 वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.