तरुण आएएस अधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू

0
5

बंगळुरु – कर्नाटकातील कोलार येथे लँड माफियांवर अंकूश ठेवणारे तरुण आएएस अधिकारी डी. के. रवी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बंगळुरुत त्यांच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. बंगळुरुचे पोलिस आयुक्त एम.एन.रेड्डी म्हणाले, ‘प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याच वाटते. मात्र, त्यांच्या घरतून सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.’

कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी देखील घटनास्थळाची पाहाणी केली आहे. त्यांनी रवी यांच्या मृत्यूची सर्वबाजूनी तपास होईल याचे आश्वासन दिले.

डी.के. रवी कर्नाटक केडरमधील 2009च्या बॅचेचे 35 वर्षीय आयएएस अधिकारी होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोलार येथून बंगळुरुमध्ये त्यांची अतिरिक्त आयुक्त (कमर्शिअल टॅक्स) या पदावर बदली झाली होती. त्यांच्या बदलीसाठी रिअल इस्टेट लॉबीचा दबाव असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यांच्या बदलीला कोलारमध्ये मोठा विरोध झाला होता. त्यांची बदली रद्द करावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी लँड माफियांना वठणीवर आणण्याचे काम कोलार येथे केले होते.