भाजपचा नगरसेवक निघाला क्रिकेट सट्टा किंग

0
17

वृत्तसंस्था
बडोदा- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 800 कोटींच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाजी नेटवर्कचा पर्दाफाश केला. सट्टा किंग म्हणून भाजपचा नगरसेवक टोमी पटेल यांचे नाव समोर आले आहे. टोमी पटेल आणि किरण मालासह 14 जणांना पोलिसांनी अटक केले आहे. आरोपींनी आतापर्यंत विश्वचषक क्रिकेटवर 800 कोटींहून जास्त रकमेची सट्टेबाजी केल्याचे उघड झाले आहे.
ईडीच्या पथकाने बडोदाजवळील सिकंदरपूर येथील फार्म हाऊसवर धाड टाकली तेव्हा हे बुकी भारत-बांगलादेशदरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा लावत होते. त्यांना आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स येत होते. बहुतांश कॉल दुबई पाकिस्तानचे होते. प्रत्येक सामन्यावर ते 25 कोटींचा व्यवहार करत होते. फार्म हाऊसवरून 100 मोबाइल फोन आणि 15 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
टोमी पटेल हा महेसाणा जिल्ह्यातील ऊंजा तालुक्यातील रहिवासी आहे. यापूर्वी टोमी पटेलचे नाव इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सट्टेबाजीत समोर आले होते. 2013 मध्ये टोमीला पोलिसांनी अटक केले होते.

टोमी पटेलविरुद्ध एका युवकाचे अपहरणसह तीन गुन्हे दाखल आहेत. जवळपास दहा वर्षांपूर्वी टोमीने सट्टा बाजारात एन्ट्री केली होती. या दरम्यान त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2011 मध्ये टोमीने भाजपच्या तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढवून नगरसेवक बनला. नंतर हळूहळू त्याने सट्टेबाजीचे नेटवर्कचा विस्तार केला. अल्पावधीत टोमीने आपले सट्टेबाजीचे नेटवर्क वापी, सुरत, बडोदा, अहमदाबाद आणि जयपूर सारख्या शहरात विस्तारीत केले. टोमीने सात बुकींच्या मदतीने सात शहरात नेटवर्क सुरु केले होते.