पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोमांस अल्पसंख्यांक समुदायाच्या जेवणातील रोजचा भाग असल्याने गोव्यात गोमांस विक्रीवर बंदी घालणार नाही असे म्हटले आहे.एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने नेहमीच गोहत्या बंदीचे समर्थन केल्यामुळेच महाराष्ट्र आणि हरयाणात सरकार येताच भाजपाने गोहत्या बंदीचा कायदा केला.
मात्र राज्यातील ख्रिश्नच आणि मुस्लिम समजाचा विश्वास जिंकण्यासाठी पक्षाला अनेक वर्ष लागली असे पार्सेकर यांनी सांगितले. गोमांस हे अल्पसंख्यांकाच्या रोजच्या जेवणात असते त्यामुळे त्यावर आम्ही कशी बंदी घालू शकतो ? असे पार्सेकर म्हणाले. गायीच्या हत्येने भावना दुखावल्या जातात. आम्ही गोव्यात गायींची आणि बैलांची हत्या करण्याची परवानगी देणार नाही. सध्या गोव्यात कर्नाटकातून गोमांस आणून विकले जाते. त्यामुळे त्यावर बंदी घालणार नाही असे पार्सेकर यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघातही काम केले आहे.