सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी

0
9

अॅडिलेड – पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 214 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी आणि 16 षटकं राखून पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉटसनने अर्धशतके करत विजयी कामगिरी सोपी केली. त्यानंतर उरले सुरले काम मॅक्सवेलने पूर्ण केले.
विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे. आता सेमी फायनलमध्ये २६ मार्च रोजी कांगारुंची गाठ भारताशी पडणार आहे. कप्तान स्मिथ आणि शेन वॅटसनने प्रत्येकी अर्धशतक झळकावले आणि २१४ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. वॅटसन व नंतर मॅक्सवेल या दोघांचाही एकेक झेल वहाबच्या गोलंदाजीवर पाकच्या क्षेत्ररक्षकांनी टाकला, अन्यथा सामन्यात अधिक रंगत आली असती. चार बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडणा-या हेझेलवूडला समानावीराचा किताब देण्यात आला.
वर्ल्डकपमधील तिस-या क्वार्टर फायनलमध्ये पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली आणि पाकिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१४ धावांचे माफक आव्हान असले तरी पाकची गोलंदाजी काही चमत्च्याकार करेल का याची उत्सुकता होती.विश्वचषकातील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत भारताबरोबर गाठ पडणार आहे. त्यामुळे जगभराबरोबरच भारतीय चाहत्यांच्याही या सामन्यावर नजरा आहेत.