23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

0
34

गडचिरोली,दि..२१: शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी विवेकानंदपूर येथे उघडकीस आली. रमेश लक्ष्मण आत्राम(३०) व दौलत बच्चा मडावी(४३) दोघेही रा.मुलचेरा अशी मृतांची नावे आहेत. रंगपंचमीच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विवेकानंदपूर येथील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयातगत गट्टा मार्गावर मक्याची शेती आहे. या शेतात वीजप्रवाह सोडण्यात आला असावा किंवा काल काही ठिकाणी पाऊस व वादळ आल्याने वीज तारा तुटून पडल्या असाव्यात. या तारांना अडकून रमेश व दौलत यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद पाठक घटनेचा तपास करीत आहेत.