कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी कनिष्ठ दर्जाच्या अधिकाèयाकडून का?

0
7

गोंदिया-गोंदिया शहर आणि तिरोडा येथील पोस्टात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे आता सिद्ध झाले आहे. या प्रकरणी पोस्टमास्टर उमेश माहुर्ले याला निलंबित केले असले तरी चौकशीची धार अद्यापही बोधट असल्याचे सांगण्यात येते. कोट्यवधीचा घोटाळा असताना योग्य दर्जाच्या अधिकाèयामार्फत चौकशी होत नसल्याने या प्रकरणात वरिष्ठ अधिकाèयांचा तर हात नसावा ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घोटाळ्यात संशयित अधिकारी व कर्मचाèयांचे अद्यापही त्याच कार्यालयात कार्यरत असणे, हे देखील संशयास्पद असल्याचे दिसून येते.
गोंदिया शहर व तिरोडा शहरातील मुख्य पोस्टात आरडी-एसबी खात्यात घोटाळा करून पोस्ट खात्याला कोट्यवधीचा चुना तेथे कार्यरत पोस्टमास्टर उमेश माहुर्ले याने लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम साप्ताहिक बेरारटाईम्सने प्रकाशित केल्याने पोस्टखात्यात मोठी धावपळ निर्माण झाली होती. परिणामी, पोस्टातील या घोटाळ्याची चौकशी तिरोडा येथून करण्यात आली. या चौकशीत माहुर्ले याने पावणे सात लाखाचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. ही घोटाळ्याची रक्कम ही माहुर्ले आणि त्याच्या इतर सहकाèयांनी वरिष्ठ अधिकाèयांना परत केल्याची माहिती आहे. या संबंधी माहुर्ले विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा बेरारटाईम्स सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने गोंदिया येथे माहुर्ले कार्यरत असल्याने चौकशी करण्यात आली. या चौकशीत सुद्धा आतापर्यंत २ कोटी ६५ लाखाचे घबाड बाहेर आले असून हा आकडा १० ते १५ कोटींच्या घरात असल्याची कुणकूण लागली आहे. दरम्यान, पोस्टखात्याच्या नियमानुसार तिरोडा येथील चौकशी ही मेल ओव्हरसियर दर्जाच्या अधिकाèयांकडून तर गोंदिया येथील डाक निरीक्षक दर्जाच्या अधिकाèयांकडून करण्यात आली. यावरून वरिष्ठ अधिकाèयांनी हे प्रकरण अद्यापही गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत नाही.
गोंदिया येथील घोटाळा हा कोट्यवधींच्या घरात असल्याने ही चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिकाèयांकडून अपेक्षित होती. दरम्यान, माहुर्ले याला मर्यादेपेक्षा अधिक रक्कमेचे व्यवहार करण्याची सूट अधिकाèयांनी कशी दिली होती, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित पोस्टात आवकपेक्षा जावक रक्कम जादा असताना आणि नियमित तपासणी होत असताना पोस्टमास्टर जनरल वा उपविभागीय डाक निरीक्षक यांच्या लक्षात न येणे, हे न समजणारे कोडे आहे.
शिवाय माहुर्ले यांना १०-१० लाखाची रक्कम सुरक्षारक्षकाविना हाताळण्याची मुभा देणाèया अधिकाèयांची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. माहुर्ले यांनी मर्यादेबाहेर व्यवहार केले असताना त्यांचे व्हावचर्स तपासणी करणारे अधिकारी हे देखील तेवढेच जबाबदार आहेत. प्रकरणात अनेक व्यवहार करताना मेसेंजर व साक्षीदार म्हणून पोस्टातील कर्मचाèयांनी सह्या केल्याची माहिती बाहेर येत आहे. त्यामुळे अशा कर्मचाèयांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. माहुर्ले हा कर्मचाèयांवर दबाव टाकून त्यांच्या सह्या घेत असल्याचे कर्मचारी दबक्या स्वरात बोलत आहेत.
या घोटाळ्यांशी ज्यांचा संबंध येऊ शकतो वा ज्यांनी आपल्या कार्यात कसूर केली, त्या सर्वांचे निष्पक्ष चौकशीसाठी किमान स्थानांतरण करणे आवश्यक होते. पण ते अद्यापही कार्यरत असल्याने कितपत निष्पक्ष चौकशी होईल, याविषयी शंका आहे.
दरम्यान, माहुर्ले यांच्या प्रकरणात चौकशी करणाèया एका बड्या पोलिस अधिकाèयांचा नातेवाइकाचा पोस्ट खात्याशी संबंध असल्याची चर्चा आहे. त्या नातेवाइकाच्या माध्यमातून थेट मुंबईपासून माहुर्ले यांना वाचविण्यासाठी फिल्डींग सुरू असल्याची चर्चा पोस्टल वर्तुळात आहे.
दरम्यान, माहुर्ले यांच्या घरातून सुमारे १० लाखाची रक्कम हस्तगत केल्याची आणि बँकांतील खाती गोठविल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे माहुर्ले यांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांच्या कार्यालयातून सेqटग जमविली असल्याने वरिष्ठ अधिकारी त्यांची मदत करीत आहेत. माहुर्ले यांच्यावरील कार्यवाही सैल करण्यासाठी लहान कर्मचाèयांकडून वसुली करण्याची शक्यता आहे. यामध्ये काही महिला कर्मचाèयांवरही कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्ङ्मान घोटाळ्ङ्मातील संगणकाचे सर्वर व कागदपत्र इतवारी ङ्मेथील पोस्ट काङ्र्मालङ्मात हलविण्ङ्मात आल्ङ्माची चर्चा आहे.सोबतच ३१ डिसेंबरला ङ्माच ‘ाहुर्ले होटल ब्लु डाङ्म‘ंड‘ध्ङ्मे दिलेल्ङ्मा एका पार्टीत जे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते त्ङ्मांची सुध्दा चौकशी होईल काङ्म ङ्मा चर्चांनाही शहर पोस्टात ऊत आला आहे.‘ोठा घोटाळा असताना केंद्राच्ङ्मा सीबीआङ्मने व लाचलुचपतविभागाने अद्याप दखल न घेतल्ङ्माने शंका व्ङ्मक्त केली जात आहे.
आरोपीला लवकरच अटक-एसडीपीओ नखातेङ्मा प्रकरणात तिरोडा पोलिस ठाण्ङ्मात गुन्हा दाखल करण्ङ्मात आलेला आहे. दरम्ङ्मान गोंदिङ्मा शहर पोस्ट ऑङ्किस ‘ध्ङ्मे सुद्धा ‘ाहुर्ले ङ्मांनी घोटाळा केल्ङ्माचे उघड झाले आहे. गोंदिङ्मा आणि तिरोडा पोस्ट ऑङ्किस प्रकरणात तिरोड्यात नोंदविण्ङ्मात आलेल्ङ्मा तक्रारी‘ध्ङ्मेच गोंदिङ्माच गुन्हा सुद्धा स‘ाविष्ठ करुन आरोपीला लवकरच अटक करण्ङ्मात ङ्मेणार असल्ङ्माची ‘ाहिती उपविभागीङ्म पोलीस अधिकारी अशोक नखाते ङ्मांनी दिली. आपण तिरोडा ङ्मेथील चौकशी अधिकाèङ्माला कारवाई करण्ङ्मासंदर्भात निर्देश दिलेले आहेत त्ङ्मातच ‘ाहुर्ले ङ्मांच्ङ्मा गोंदिङ्मा स्थित विविध बँका‘ध्ङ्मे एक कोटीच्ङ्मावर रक्क‘ असल्ङ्माचे आढळून आले आहे. प्रकरण ‘ोठे असल्ङ्माने आरोपीला अटक पूर्व जा‘िन सुद्धा ‘िळणे कठिण असून ङ्मा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशष शाखेकडे लवकरच हस्तांतरित करण्ङ्मात ङ्मेणार असल्ङ्माची ‘ाहिती ही नखाते ङ्मांनी दिली.