शिक्षकांच्यामागण्यांना घेऊन शिक्षक संघाचे आंदोलन

0
7

गोंदिया : जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी व आमगाव तालुक्याचे जानेवारी व देवरी तालुक्यातील ११ शाळांचे डिसेंबर २०१४ चे वेतन आणि जिल्ह्यातील अजिर्तरजा, वैद्यकीय बिल, प्रसूती रजा, एकस्तर थकबाकीचे रखडलेले देयक अविलंब काढण्याच्या मागण्यांना घेऊन मंगळवारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
शिक्षकांचे वेतन १ तारखेला करणे,गोरेगाव तालुक्यातील १९२ शिक्षकांच्या एलटीसीचा प्रश्न सोडविणे.नियमित झालेल्या शिक्षणसेवकांचे वेतन शालार्थ पद्धतीने काढणे,सहाव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करणे,पदवीधरांची पदोन्नती शासननिर्णयाप्रमाणे करणे, फेब्रुवारी २०१५ चे व आमगाव तालुक्यातील जानेवारी २०१५ चे वेतन व देवरी तालुक्यातील ११ शिक्षकांचे डिसेंबर २०१४ चे वेतन व प्रसूती रजा, वैद्यकीय बिल, एकस्तरची थकबाकी आदी मागण्याना घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे टी.के.नंदेश्वर,आनंद पुंजे,एस.यु.वंजारी,केदार गोटेफोडे,सुधीर बाजपेयी,नागसेन भालेराव,नूतन बांगरे,अरुण कटरे,रेणुका जोशी,डी.टी.कावळे,एन.जे.रहागंडाले,गणेश चुटे,जी.जी.दमाहे,आर.जे.टेभरे,मोरेश्वर बडवाईक,नाननबाई बिसेन,यशोधरा सोनवाने,विरेंद्र चौहाण,के.आर.कापसे,दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले होते.
तर दुसरीकडे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळानेही मुख्य लेखा वित्त अधिकारी राम चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. सर्वच देयके कोषागार कार्यालयाला ३१मार्च २०१५ ला पाठविण्याची संबंधितांच्या खात्यावर नोंद घेण्याविषयी व पुढील महिन्यात डीसीपीएसची कपात सुरू करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, शेषराव येळेकर, किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, नरेश बडवाईक, संदीप तिडके, एस.सी. पारधी, सतीश दमाहे, राजकुमार बसोने, टी.आर. लिल्हारे, उपस्थित होते.