मुंबई (वृत्तसंस्था),दि.23- देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार देखील उपमुख्यमंत्री विराजमान झाले. या राजकीय कलाटणीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. संध्याकाळी मुंबईतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देणार असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीजी है तो मुमकीन है… असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच ही खेळी यशस्वी ठरल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी पाहायला मिळताहेत आणि शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगताना दिसतेय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडल्याचे दिसून येते.
फडणवीस म्हणाले की, मोदी है तो मुमकीन है. मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी मोदींचे आणि अमित शाहांचे आभार मानतो. आपली बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. अजित पवार समर्थनातून मजबूत सरकार देण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच मजबूतीने आणि भ्रष्टाचारमुक्त काम करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी पवार मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देण्यात आल्या.मोदी है तो मुमकिन है.. असे म्हणत फडणवीस यांनी मोदींचेही आभार मानले. मी आपल्याला विश्वास देतो की, 5 वर्षे अत्यंत ताकदीने, मजबुतीने हे सरकार काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेनुसार राज्य सरकार काम करेल. शेतकऱ्यांच्या हिसासाठी सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान यावेळी भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, विनोद तावडे यासंह इतर नेत्यांची उपस्थिती होती.





