32.7 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home Top News आजपासून ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात

आजपासून ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात

0
40

उस्मानाबाद,दि.10ःः आजपासून 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. यंदाच्या संमेलनाच्या यजमान पदाचा मान उस्मानाबादला मिळाला आहे. या कार्यक्रमाला नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.याचप्रमाणे भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. 93 व्या साहित्य संमेलनात या पुस्तिकेच्या निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी वीर सावरकर विचार परिवारने केली आहे.दरम्यान, यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची २०० दालने उभारण्यात आली आहेत.