गडचिरोली,दि.22- जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्ताने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा व चपराळा, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी, वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथे भव्य यात्रा भरतात. यामध्ये लाखो भाविक हजेरी लावत असतात.गडचिरोली पोलीस दलाने सदर बाब हेरून या ठिकाणी नक्षलविरोधात बॅनर पोस्टर्स लावले आहेत.नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाने बॅनरद्वारे केले आहे.तर नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्यासाठी ‘मी नक्षलवादी’ या आशयाची उपहासात्मक कवितेचे बॅनर यात्रेकरूंचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेत आहेत.या कवितेत नक्षलवादी स्वतःच्या फायद्यासाठी कशाप्रकारे आदिवासी बांधवावर अन्याय,अत्याचार करत आहेत याचे वास्तव मांडण्यात आले आहे.त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध पोस्ट,उपपोस्ट,पोमके हद्दीतील हरवलेले इसम,अनोळखी मृतदेह यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेऊन त्यांचे फोटो व इत्तंभूत माहिती सोबत देवून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.





