आयआयटी-मद्रासमध्ये दलित विद्यार्थ्यांवर बंदी

0
11

वृत्तसंस्था
चेन्नई दि.२९- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांवर टीका केल्याने आयआयटी मद्रासने दलित विद्यार्थ्यांच्या एका संघटनेवर बंदी घातली आहे. आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळ (एपीएससी)असे या दलित संघटनेचे नाव आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून तक्रार मिळाल्यानंतर आयआयटी-मद्रासने एपीएससीवर बंदीचा फतवा काढला आहे.

मिळालेली माहिती अशी की, आयआयटी-मद्रासच्या कॅम्पसमध्ये आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळातंर्गत (एपीएससी) ‘डिस्कसन फोरम’ पंतप्रधानांच्या गोमांस बंदी आणि हिंदी भाषेला प्राधान्य देण्याच्या निर्णयावरुन वारंवार टीका करत असल्याचे दिसून आले आहे. यावरून आंबेडकर पेरियार मंडळाच्या विद्यार्थ्यांना आयआयटी- मद्रास कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यास मनाई घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंबेडकर पेरियार मंडळाविषयी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मागितली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उपसच‍िव प्रिस्का मॅथ्यू यांनी आयआयटी-मद्रासला 15 मे रोजी एक पत्र पाठवले. आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आयआयटी-मद्रास कॅम्पसमध्ये पंतप्रधानांवर टीका करणारे पॉम्पलेट वितरीत केले आहेत. या विद्यार्थ्यांविरोधात वारंवार तक्रारी मिळत आहेत. या संदर्भात संस्थेने लवकरात लवकर चौकशी करून स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश या पत्राद्वारे करण्‍यात आले आहे.
मनुष्य विकास मंत्रालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर 24 मे रोजी आयआयटीचे प्राचार्य शिवकुमार एम श्रीनिवासन यांनी आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळाच्या (एपीएससी) समन्वयकाला इ-मेल पाठवून आपल्या हालचाली बंद करण्‍यास सांगितले आहे.