यदुवीर झाले म्हैसूरचे 27 वे राजे

0
9

वृत्तसंस्था
म्हैसूर/डूंगरपूर, दि.२९– सिटी आॅफ पॅलेस… अशी ओळख असलेल्या म्हैसूर शहराला आज नवीन राजा मिळाला. लोकशाहीत कायदेशीर स्थान नसले तरी गुरुवारी राज्याभिषेकाच्या सोहळ्यात चांदीच्या राजसिंहासनावर विराजमान झालेले यदुवीर कृष्णदत्त चामराजा वडियार. निपुत्रिक राणी प्रमोदादेवी यांनी पतीच्या निधनानंतर दत्तक घेतलेल्या यदुवीर यांना राजा होण्याचा मान अवघ्या २३व्या वर्षी मिळाला आहे. वडियार राजघराण्याने १३९९पासून प्रजासत्ताकाच्या निर्मितीपर्यंत म्हणजे १९५०पर्यंत म्हैसूरवर राज्य केले.
यदुवीर कृष्णदत्त वडियार हे वयाच्या 23 व्या वर्षीच म्हैसूरचे 27 वे राजे झाले आहेत. गुरुवारी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी अमेरिकेतून इंग्रजी आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. राजस्थानमधील डूंगरपूरचे राजा हर्षवर्धन यांची कन्या तृषिकासोबत येत्या डिसेंबरमध्ये यदुवीर यांचा विवाह होणार आहे.
राजे यदुवीर हे त्यांचे चुलत आजोबा श्रीकांतदत्त वडियार यांच्या गादीवर विराजमान झाले आहेत. डिसेंबर 2013 मध्ये श्रीकांतदत्त वडयार यांचे निधन झाले होते. श्रीकांतदत्त यांना अपत्य नव्हते. पत्नी प्रमोददेवी यांनी नुकतेच यदुवीर यांना दत्तक घेतले. राज्याभिषेक सोहळ्याला डूंगरपुरच्या राजघराण्याची राजकुमारी आणि म्हैसूरची होणारी राणी तृषिका पोहोचली होती.

10 हजार कोटींच्या मालमत्तेचे मालिक
राजा-राणीच्या गोष्‍टी आपण पुस्तकात वाचल्या असतील. परंतु अजुनही देशातील अनेक राज्यांत लोकशाहीत राजेशाहीची परंपरा सुरुच आहे. म्हैसूर हे देखील त्या पैकी एक आहे.
> वडियार राजपरिवाराकडे 10 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
> म्हैसूर, बंगळुरु व हासनमध्ये 1500 एकर जमीन. परंतु सध्या त्यावरून वाद सुरु आहे.
> कर्नाटक सरकारविरोधात महलाचा ताबा घेण्याच्या तयारीत वाहे.
> श्रीकांतदत्त वडियार यांच्या 15 लक्झरी कार, सर्व कारचा नंबर 1953 असा आहे. 1953 हे श्रीकांतदत्त यांचे जन्मवर्ष आहे.