24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News केमिकल प्लांटमध्ये झालेल्या गॅस गळतीत 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

केमिकल प्लांटमध्ये झालेल्या गॅस गळतीत 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

0
264

विशाखापट्टणम(वृत्तसंस्था)दि.07ः. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील व्यंकटपूरम गावामध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजता केमिकल फॅक्ट्रीतील गॅस लीक झाल्यामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. हा गॅस एलजी पॉलिमर्स इंडस्ट्रीच्या प्लांटमधून लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार एक हजारपेक्षा जास्त लोक आजारी पडले आहेत.

जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यंकटपूरम गावाच्या जवळपास असलेल्या लोकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे म्हटले आहे. काही लोकांना चक्करही येत आहे. काही लोकांच्या शरीरावर लाल चट्टे पडले आहेत.एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले आहे. गोपालपट्टनम सर्कलचे पोलीस अधिकारी रमान्या यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार त्यांना जवळपास 50 लोक रस्त्यावर बेशुद्ध आढळून आले. घटनास्थळार पोहोचण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागले.

blank