राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट

0
6

सिंधुदुर्ग दि. २५: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (दि. २४) काँग्रेसचे नेते नारायण राणेंची भेट घेतली. राज ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. ते कणकवलीमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.राज ठाकरे (दि. २४) राणेंच्या कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर गेले आणि त्यांच्यासोबत तासभर चर्चा केली. मात्र या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा दारुण पराभव झाला, तेव्हापासून राणे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याधीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांच्यावर टीका केली.मात्र मागील काही दिवसापासून नारायण राणे शांत आहेत आणि या शांततेच्या काळात राज ठाकरेंनी राणेंची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली, याची उत्सुकता लागली आहे.