गोंदिया जिल्ह्यात खोडशिवनीच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

0
9922
खोडशिवनी गावाला असे सिल करण्यात आले आहे.

गोंदिया,दि.02ः- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे.आज 2 जुलै रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत्यूचा आकडा आता 2 वर पोचला असून पहिल्या रुग्णाचा मृत्यू हा नागपूरात झाला तर दुसर्या रुग्णाचा मृत्यू गोंदियात कोरोनावरील उपचार सुरु असताना झालेला आहे.खोडशिवनीतील रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्या गावात कडक बंदोबस्त करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी व इन्सिडंट कमांडर शिल्पा सोनाले यांनी त्या गावच्या पुर्ण सिल करण्याचे आदेश दिले असून मृत रुग्णावर गोंदियातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटूबियांनी गावकर्यांच्या चर्चेनंतर घेतल्याची माहिती आहे.