माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम काळाच्या पडद्याआड

0
15

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

शिलॉंग, दि. 27 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे शिलांगच्या रुग्णालयात आज सोमवारी सायंकाळी पावणे आठ वाजता काळाच्या पडद्या आड गेले.
डॉ. कलाम हे एका कार्यक्रमानिमित्त शिलॉंंग येथे गेले होते. त्या कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
डॉ. कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. मिसाइलमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथे 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. ते भारताच्या राष्ट्रपती पदावर 2002 ते 2007 पर्यंत कार्यरत होते. त्यांना 1997 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.
84 वर्षांचे डॉ. कलाम येथील ‘आयआयएम‘च्या एका कार्यक्रमासाठी आले होते. येथे भाषण देतानाच डॉ. कलाम कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते.
डॉ.कलाम यांना दिल्ली येथे आणण्यात येणार असून त्याच्या पार्थिवावर रामेश्वरम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे भारतीय वायूदलातील सुखोई विमानाचे उड्डाण करणारे ते पहिले राष्ट्रपती होते, हे येथे उल्लेखनीय. पोखरण मधील पहिली अणूचाचणी ही त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आली होती. दुसऱ्या अणुचाचणीच्या वेळीही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. कलाम यांनी तयार केलेल्या या उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने भारताने 1980 मध्ये रोहिणी उपग्रह अवकाशात पाठवला होता.
शिलाँग इथे आयआयएममध्ये सोमवारी एपीजे अब्दुल कलाम यांचं भाषण सुरू होते. कलाम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते मंचावरच कोसळले. यानंतर त्यांना तातडीने शिलाँगमधल्या बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर प्रोटोकॉलनुसार आर्मीच्या डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. डॉ. कलाम यांनी अग्नीपंख हे पुस्तक लिहिले. त्यांचे हे पुस्तक तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

पुरस्कार/सम्‍मान:

डॉ0 कलाम यांची विद्वता आणि योग्यता लक्षात घेत त्यांनी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्ना यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी, कल्याणी विश्वविद्यालय, हैदराबाद विश्वविद्यालय, जादवपुर विश्‍वविद्यालय, बनारस हिन्दू विश्वविद्यालय, मैसूर विश्वविद्यालय, रूड़की विश्वविद्यालय, इलाहाबाद विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, मद्रास विश्वविद्यालय, आंध्र विश्वविद्यालय, भारतीदासन छत्रपति शाहूजी महाराज विश्वविद्यालय, तेजपुर विश्वविद्यालय, कामराज मदुरै विश्वविद्यालय, राजीव गाँधी प्रौद्यौगिकी विश्वविद्यालय, आई.आई.टी. दिल्ली, आई.आई.टी; मुम्बई, आई.आई.टी. कानपुर, बिड़ला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलाजी, इंडियन स्कूल ऑफ साइंस, सयाजीराव यूनिवर्सिटी औफ बड़ौदा, मनीपाल एकेडमी ऑफ हॉयर एजुकेशन, विश्वेश्वरैया टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी ने वेगवेगळी ‘डॉक्टर ऑफ साइंस’ या पदव्या दिल्या.
याशिवाय जवाहरलाल नेहरू टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी, हैदराबादने त्यांना ‘पी.एच.डी.’ (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) तथा विश्वभारती शान्ति निकेतन और डॉ0 बाबासाहब भीमराव अम्बेडकर यूनिवर्सिटी, औरंगाबाद ने त्यांना ‘डी.लिट.’ (डॉक्टर ऑफ लिटरेचर) या मानद पदव्या प्रदान केल्या.
यात इण्डियन नेशनल एकेडमी ऑफ इंजीनियरिंग, इण्डियन एकेडमी ऑफ साइंसेज, बंगलुरू, नेशनल एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेज, नवीदिल्लीचे सम्मानित सदस्य, एरोनॉटिकल सोसाइटी ऑफ इंडिया, इंस्टीट्यूशन ऑफ इलेक्ट्रानिक्स एण्ड् टेलीकम्‍यूनिकेशन इंजीनियर्स के मानद सदस्य, इजीनियरिंग स्टॉफ कॉलेज ऑफ इण्डिया के प्रोफेसर तथा इसरो के विशेष प्रोफेसर हैं।
डॉ. कलाम यांनी केलेल्या विज्ञान एवं प्रौद्योगिकी विकासामुळे विभिन्न संस्थांनी त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले.

डॉ कलाम यांनी मिळालेले पुरस्कार
नेशनल डिजाइन एवार्ड-1980 (इंस्टीटयूशन ऑफ इंजीनियर्स, भारत),
डॉ. बिरेन रॉय स्पे्स अवार्ड-1986 (एरोनॉटिकल सोसाइटी ऑफ इण्डिया),
ओम प्रकाश भसीन पुरस्कार,
राष्ट्रीय नेहरू पुरस्कार-1990 (मध्य‍ प्रदेश सरकार),
आर्यभट्ट पुरस्कार-1994 (एस्ट्रोपनॉमिकल सोसाइटी ऑफ इंडिया),
प्रो. वाई. नयूडम्मा (मेमोरियल गोल्ड मेडल-1996 (आंध्र प्रदेश एकेडमी ऑफ साइंसेज),
जी.एम. मोदी पुरस्कार-1996, एच.के. फिरोदिया पुरस्कार-1996, वीर सावरकर पुरस्कार-1998 इत्यादी.
त्यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी इन्दिरा गाँधी पुरस्कार (1997) प्रदान केल्या गेला. याशिवाय भारत सरकारने त्यांना क्रमश: पद्म भूषण (1981), पद्म विभूषण (1990) आणि ‘भारत रत्न’ सम्मान (1997) इत्यादिंनी पुरस्कृत केले.
डॉ. कलाम यांची जीवन साधे असले तरी विचार मात्र उच्च दर्जाचे होते. अशा या महानायकाने आज 27 जूलै 2015 च्या सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.

कलाम यांची प्रसिद्ध पुस्तके

डॉ. अब्दुल कलाम हे भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आहेत. अरूण तिवारी लिखित त्यांचे आत्मचरित्र ‘विंग्स ऑफ़ फायर’भारतीय तरूण आणि बालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये ‘गाइडिंग सोल्स: डायलॉग्स ऑन द पर्पज ऑफ़ लाइफ’ एक गम्‍भीर कृति आहे. या पुस्तकांचे सहलेखक अरूण के. तिवारी हे आहेत.
याशिवाय अन्य पुस्तकांत ‘इग्नाइटेड माइंडस: अनलीशिंग दा पॉवर विदीन इंडिया’ ‘एनविजनिंग अन एमपावर्ड नेशन: टेक्नोलॉजी फॉर सोसायटल ट्रांसफारमेशन’ ‘डेवलपमेंट्स इन फ्ल्यूड मैकेनिक्सि एण्ड स्पेस टेक्नालॉजी’ , सहलेखक- आर. नरसिम्हा‍, ‘2020: ए विज़न फॉर दा न्यू मिलेनियम’ सह लेखक- वाई.एस. राजन, ‘इनविज़निंग ऐन इम्पॉएवर्ड नेशन: टेक्नोमलॅजी फॉर सोसाइटल ट्राँसफॉरमेशन’ सह लेखक- ए. सिवाथनु पिल्लई.

डॉ. कलाम- एक कवी
डॉ. कलाम हे एक उत्तम कवी देखील होते. तमिळ भाषेत त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत. त्यांच्या या कविता अनेक मासिकातून प्रकाशितही करण्यात आल्या. ‘दा लाइफ ट्री’ हा कवितासंग्रह इंग्रजीत प्रकाशित झाला आहे.