तीन दिवसीय शंकर पटाचे बक्षीस वितरण संपन्न

0
61

चिचगड,दि.१२ः चिचगड येथे आयोजित शंकरपट स्पर्धेचे बक्षिस वितरण आज 12 मार्च रोजी पार पडले.या शंकर पटातील पहिले बक्षिस आमगाव विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांच्याकडून मोटर सायकल होंडा हे रामा नंदी या बैलजोडीने जिंकले. ही जोडी मध्यप्रदेश राज्यातील होती.तर व्दितीय क्रमांकाचा बक्षिस देवराज गुन्हेवार यांच्याकडून 51 हजार हा अर्जुन कबूतर यांच्या बैलजोडीने जिंकला.ही बैलजोडी सुध्दा मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मोहाडी येथील होती.तर तृतीय बक्षिस राजू गुन्हेवार यांच्याकडून 31000 हाेते,हा बक्षिस सिवनी येथील शुक्ला यांच्या बैलजोडीने जिंकला.चौथा बक्षिस देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन यांच्याकडून २१००० हजाराचे होते,हा बक्षिस अजीम पटेल यांच्या बैलजोडीने जिंकला.बक्षिस वितरण सोहळा जिल्हा परिषद सदस्य राधिकाताई धरमगुडे यांच्या उपस्थितीत पटसमितीचे अध्यक्ष विजय कच्छप ,उपाध्यक्ष राजू शहारे, सचिव अरविंद परिहार, कोशाध्यक्ष शितल परिहार ,चिचगड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला चिचगड सरपंच भाग्यश्री भोयर,उपसरपंच घसरण धरमगुडे,दुर्गेश कटकवार,शाईन सय्यद,विकास जनबंधू, शहाळा सर,अण्णा जैन,मारोती खंडारे, भुवन नरवरे,तिलक धरमगुडे,बंडू गावळ,ओगंनुजी भोयर,श्रीरामजी गावड, मधु कोल्हारे आणि बरेच गावकरी उपस्थित होते.या शंकरपटांमध्ये 193 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.त्यातील 61 क्रमाकंपर्यंत जिंकणाऱ्या सर्व जोडींना पंधराशे रुपये व 61 नंबर नंतरच्या सर्व जोड्यांना अकराशे रुपये व पराभूत सर्व जोळ्यांना ताट वाटी ग्लास असे देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.