मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत सुयश

0
12

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्यांनी गणित प्राविण्य परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. गणित अध्यापक मंडळ गोंदिया द्वारा आयोजित गणित प्राविण्य परीक्षेत वर्ग 5 वीचा मधुर पारस पवनकुमार रहांगडाले, अंशुल रामरतन कामथे, आर्यन मधुकर पवार यांनी यश प्राप्त केले आहे.विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक प्रा.आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, सर्व शिक्षक वृंद तसेच आपल्या आईवडिलांना दिले.