पुन्हा येतील मोदीच!प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

0
15

• भंडारा-गोंदियांच्या नागरिकांचे दमदार समर्थन

• संपर्क से समर्थन अभियान, कार्यकर्त्यांशी संवाद, मान्यवरांच्या भेटी

गोंदिया-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मागील ९ वर्षांत भारताची प्रतिमा जगभर उजळली. केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणाच्या योजनामुळे जनसमान्यांना लाभ झाला. यामुळे येत्या निवडणुकीत मोदीनांच पंतप्रधान होण्यासाठी समर्थन देऊ असा निर्धार भंडारा-गोंदिया येथील नागरिकांनी केला व ‘पुन्हा येतील मोदीच’ असा नारा देत जोरदार समर्थन दिले.

शनिवारी (ता. 26) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद यात्रेअंतर्गत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. या प्रवासात त्यांनी भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व संपर्क से समर्थन अभियानात सहभागी झाले. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रात ६०० कार्यकर्ते दररोज ‘घर चलो अभियान’ राबविणार आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न भाजपा कार्यकर्त्यांचा असावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सकाळी भंडारा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर गांधी चौक ते सदर बाजारपर्यंत, संपर्क से समर्थन अभियानात सहभागी झाले. भंडारा येथे ते साकोली, तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघांतील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सायंकाळी गोंदिया येथे गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौकापर्यंत संपर्क से समर्थन अभियानात सहभागी झाले. गोंदिया येथे तिरोडा, अर्जुनी मोरगाव व गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

प्रदेश अध्यक्षांच्या या दौऱ्यात खासदार सुनील मेंढे, राज्य लोकसभा प्रवास संयोजक बाळा भेगडे, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष अड. येशूलाल उपराडे, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, राजकुमार बडोले, जि. प. अध्यक्ष पंकज राहंगडाले, माजी आमदार केशवराव मानकर, हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, रमेश कुथे, भेरसिंह नागपुरे, संजय पुराम, खोमेश रहांगडाले, भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक प्रमुख विजय शिवणकर, भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर,माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रचनाताई गहाने, अनूप ढोके, संजय कुलकर्णी, भावनाताई कदम, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिष्ठितांच्या भेटीतून संपर्क
या लोकसभा प्रवासात भंडारा येथे संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णाजी बावनकर, प्रतिष्ठित व्यावसायिक श्री राजूजी बनसोड, प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत पडोळे तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते श्री रामकुमार गजभिये यांची स्नेहभेट घेतली. गोंदिया येथे युवा उद्योजक व व्यापारी रोशन जयस्वाल, आदिवासी गोंड समाजाचे नेते नुतनजी वट्टी, जनता सहकारी बॅंकेच्या संचालक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या हर्षिला वैद्य यांची भेट घेतली. इस्त्रोमध्ये काम करणारे गौरव लंजे यांच्या सहकार नगरातील निवासस्थानी जाऊन त्यांचे वडील यशवंत लंजे यांची भेट घेतली आणि शाल-श्रीफळ देऊन मुलाच्या कामगिरीबद्दल आईवडीलांचा सत्कार केला.

वडेट्टीवारांना दाखविण्यासाठी बोलावेच लागते
विजय वडेट्टीवारहे आता काँग्रेसचे नवीनच विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना बोलावेच लागते. काँग्रेस पक्षामध्ये सध्या कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कोण जास्त बोलतात हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला दाखवण्यासाठी ते बोलतात. त्यामुळे यात काही फारसे मनावर घेण्यासारखे नाही, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.