गोंदिया,दि.27-भक्त निवास सभागृह, भानपुर येथे जिल्हा परिषद क्षेत्र रतनारा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील बूथ कमिटीचे सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक भूमिकेला आपण सर्वांनी साथ दिली यातूनच साहेबांप्रती असलेला विश्वास दृढ होतो. कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह कायम ठेऊन सर्वसामान्य जनतेची कामे करावी. जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व गावातील प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनवून कमिटीच्या माध्यमातून सर्व घटकांच्या नवीन लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, प्रत्येक गावांतील सक्षम बूथ कमेटी तयार करून संघटन मजबूत करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. .
या बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, घनश्याम मस्करे, रविकांत बोपचे, केतन तूरकर, नीरज उपवंशी, शंकरलाल टेभरें, रवीकुमार पटले, सरिताताई कटरे, चेतनाताई पटले, अमरदास डहाके, नरहरप्रसाद मस्करे, पदमलाल चौरिवार, धर्मराज कटरे, नितीन टेम्भरे, योगेश कंसारे, दुलीचंद चौरीवार, हेमराज डहाके, बाबुलाल जरताळ, छबीलाल शेंडे, विनोद कोहपरकर, भरत टेकाम, कृष्णकुमार ठकरेले, दुरूकचंद बिसेन, सुरेंद नागपुरे, रितेश ठकरेले, रामेश्वर चौरागडे, सत्यम कावडे, मुनेश्वर कावडे, जितेंद्र बिसेन, अनिल खरोले, योगेश पतेह, विजय बिसेन, यादोराव सोनवाने, भोजराम बिसेन, देवाजी कटरे, अनिल नांदले, ईदेलला चिखलोंडे, निमिषा चौरिवार, रत्नमाला लिल्हारे, नीटेश बारेवार, मुन्नालाल नागपुरे, नोकलाल दमाहे, राजेश गेडाम, सुखराम तुमसरे, योगी येडे, नंदेश्वर लिल्हारे, ओंकारलाल पतेह, रामेश्वर कावडे, दिगंबर हरिणखेडे, मोतीलाल चौधरी, मणिराम राऊत, विनोद चौधरी, रवीकुमार उपवंशी, डी बी टेम्भरे, सुनील गौतम, विजय भोंडेकर, चुन्नीलाल नेवारे, अंगदलाल उपवंशी, सचिन ठवरे, दुर्योधन भोयर, प्रभुदास बिंझाडे, विजय लिल्हारे, शैलेश उके, विजेंद्र बोरकर, श्यामू दमाहे, यादो धमाडे, संतोष कावडे, इंद्रजित दाऊदसरे, देवकुमार भोयर, जगदीश चौधरी, प्रीतम लिल्हारे, संदीप सहारे, भूमेश ठाकरे, विक्की भोयर सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.