36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Uncategorized वाघांचे दोन बछडे मृतावस्थेत

वाघांचे दोन बछडे मृतावस्थेत

0
20
file photo

blank

चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागात गुरुवार ७ सप्टेंबर रोजी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. बछडयांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक ५७२ मध्ये त्यांना अपंग वाघाचे बछडे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले.त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर जवानांना वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सविस्तर पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता.

blank