37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Uncategorized चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन; कंत्राटी भरतीचा आदेश...

चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन; कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी

0
18

blank

वर्धा : कंत्राटी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्यावतीन सुशिक्षित युवकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून पकोडे, चहा व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोख आंदोलन करण्यात येत आहेशासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.नितेश कराळे यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला युवकांचा मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर वर्धेच्या गांधी चौकात युवकानी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात युवक मौनव्रत सत्याग्रह करणार आहे. जेव्हापर्यंत हा शासन निर्णय सरकार परत घेणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच युवकांनी सांगितलं.

blank