जिल्हा ग्रामसेवक युनियनच्याा वार्षिक अधिवेशन व पतसंस्था आमसभेत आदर्श ग्रामसेवकांचा सत्कार

0
12

गोंदिया,दि.01- येथील मयूर लॉन येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे वार्षिक अधिवेशन व गोंदिया जिल्हा ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक पतसंस्थेची आमसभा अध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .सदर सभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर व गट विकास अधिकारी गोंदिया आ. पो.पिंगळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन उत्कृष्ठ ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.सदर अधिवेशनात सर्वप्रथम सेवानिवृत्त कर्मचारी यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला यामधे पुरुषोत्तम एम. समरीत ,कुशोबा टी. बाळणे ,देवराम एस मेश्राम ,विनोद जे. रोकडे ,प्रेमलाल ए. भिलकर ,.बेनिप्रसाद एस. तूरकर,एस .सी .तागडे यांचा समावेश होता. तद्नंतर पदोन्नती द्वारे विस्तार अधिकारी झालेले पदोन्नती सभासदांचे सत्कार शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह सह टेनिलाल डी. बिसेन,पुंडलिक आर. कुटे , अतुलकुमार. डी. पवार ,कार्तिक एस. चव्हाण , छत्रपती आर. काटगाये ,यशवंत सी. पटले , चंद्रभुषण आर. सहारे , अनिल सी. राणे ,कांतीकुमार एस. सेंदूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

सन 2020-21,2021-22 व 2022-23 या वर्षात झालेल्या आठ गटातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यात सन 2020 2021 आदर्श ग्रामसेवक ए डी कावळे देवरी,कु.मंगला गजानन आगासे (पं.स गोरेगाव),पि एम चव्हाण (पं. स सालेकसा),एस बी पटले (पं. स.आमगाव),डब्लू बी कांबळे (पं. स तिरोडा),ये जी कासारे (पं. स.सडक अर्जुनी),पी वाय नगराळे (पं. स अजुनी मोरगाव),एन.एच मेश्राम (पं. स गोंदिया).

सन 2021 22 आदर्श ग्रामसेवक टी बी कुबडे (पं. स.देवरी),कु .ज्योती ई बीसेन(पं. स सालेकसा),विजय एन बिसेन (पं. स आमगाव),रीना उत्तम शहरे (पं. स.गोरेगाव),विलास रामकृष्ण मशराम तिरोडा,कु.एस आर सूर्यवंशी( पं.स स डक अर्जुनी),पी एम पवार (पं. स.अर्जुनी मोरगाव),पी.सी मेश्राम( पं.गोंदिया).

सन 2022 23 आदर्श ग्रामसेवक श्री. तुलसीदास रामनाथ वाघमारे (पं. स देवरी)श्री.पांडुरंग श्रीराम हरींनखेडे (पं. स.गोरेगाव)कु.रोहिणी मारोती ऊके (पं. स.सालेकसा),नरेंद्र एच. चौधरी (पं. स.आमगाव),शैलेश रतीराम परिहार (पं. स तिरोडा),.टिकाराम रामजी जनबंधू (पं. स अर्जुनी मोरगाव),एल डी तावाडे (पं. स गोंदिया),ओमेश्वर एन कापगते (पं. स सडक अर्जुनी).

तसेच सरतेशेवटी नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामसेवक संवर्ग मधून निवडून गेलेले मुख्य कार्यकारी पद सचिव म्हणून निवडून गेलेले कमलेश बिसेन,संचालक म्हणून निवडून गेलेले हंसराज गजभिये ,सचिन कुथे , ओमेश्वर बिसेन ,अजय रामटेके ,रितेश सहारे ,दिलीप शेंडे ,रेखा अतकरी ,दयानंद फटिंग यांचे सत्कार करण्यात आले .
सत्कार समारंभ पार पडले नंतर अध्यक्ष कमलेश बिसेन यांचे द्वारे पतसंस्था आमसभा अहवाल वाचून दाखविण्यात येवून अनेक धोरणात्मक निर्णय सर्व संमतीने घेण्यात आले .यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सभेला संबोधित केले व काळ परिस्थिती नुसार स्वतःत बदल करून अधिक पारदर्शक व डिजिटल स्मार्ट वर्क करण्याची गरज़ प्रतिपादन करून लोकाभिमुख काम करण्याचे निर्देश दिले .गोविंद खामकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही अनेक येणारे नविन आवाहन व त्यावर उपाय बद्दल मार्गदर्शन केले गट विकास अधिकारी ओ पी पिंगळे यांनी काम करीत असताना शिस्त व पारिवारिक एकोपा ठेऊन प्रशासकीय कामे सहज सुलभ करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रम नियोजन कार्तिक चव्हाण ,सूत्र संचालन कुलदीप कापगते प्रास्ताविक कमलेश बिसेन तर आभार शैलेश परिहार यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते .