जिल्हा व सत्र न्यायालयात “स्वच्छता ही सेवा” मोहिमेत स्वच्छता अभियान

0
8

गोंदिया- स्वच्छता ही सेवा ही राष्ट्रीय मोहीमेअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय गोंदिया व संलग्न तालुका न्यायालय येथे २१ सप्टेंबर पासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत आज ०१ ऑक्टोबर रोजी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “एक तारिख एक तास” या मोहिमेत गोंदिया येथील विधी सेवा सदन, न्यायीक इमारती व न्यायालयीन परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यामध्ये गोंदिया येथील न्यायिक अधिकारी ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश-१, एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश-२, आर. एस. कानडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एस. व्ही. पिंपळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, एस. आर. मोकाशी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, एस. एस. धपाटे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व्हीं. ए. अवघडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, एम. बी. कुडते, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वाय. जे. तांबोळी, 4 थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, एस. डी. वाघमारे, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश, श्रीमती. टी. व्ही. गवई 6 वे सह दिवाणी न्यायाधीश, ॲड. ओ. जी. मेठी, ॲड. राठोड, ॲड. आगासे व कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील सर्व वकील पदाधिकारी व न्यायीक कर्मचारी, पी. पी. पांडे, प्रबंधक, जिल्हा न्यायालय गोंदिया व गोंदिया येथील सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता अभियान राबविले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हा न्यायालय, गोंदिया यांच्यातर्फे स्वच्छता दूत म्हणून दैनंदिन स्वच्छता राबविणारे नगर परिषद, गोंदिया येथील स्वच्छता कर्मचारी यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते विधी स्वयंसेवक तथा स्वच्छता दूत म्हणून टोपी व टी-शर्ट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया या न्यायीक इमारत व परिसराचे दैनंदिन स्वच्छता राबविणारे न्यायिक सफाईगार कर्मचारी यांचा सुद्धा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते टोपी व टी-शर्ट देऊन सत्कार करण्यात आले.
स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया तथा जिल्हा वकील संघ व सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.