ग्रामपंचायत निवेदनाची दखल घेत नसल्याने युवकाची विरुगीरी

0
21

गोंंदिया,दि.11- ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनाची वेळीच दखल घेतली जात. गया ग्रामसेवक माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप करीत गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील युवकाने बुधवारी सकाळी गावातील पाणीटाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत आपल्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत पाणीटाकीवरुन खाली उतरणार अशी भुमिका या युवकाने घेतली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस व प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले त्यांनी युवकाशी सवांद साधून त्यांच्या मागण्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाण्याच्या टाकीवरुन उतरला.

गोंदिया तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील पाणीटाकीवर नरेन्द्र भीमराव गजभिये हा युवक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चढला. शासन व अधिकारी हे आपण दिलेल्या निवेदनावर काही कारवाई करीत नाही. आपण वारंवार निवेदन देऊन थकलो असून जोपर्यंत आपल्या मागण्या होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भुमिका या युवकाने घेतली आहे. अर्जुनी येथील ग्रामसेवक माहीतीच्या अधिकारांतर्गत माहीती देत नाही. तसेच जिल्हा परिषद शाळेत झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड ही नियमानुसार घेण्यात आली नसल्याचा आरोप या युवकाने केला आहे.