मुलामुलींनी पळून लग्न केले

0
425

चिचगड,दि.13ः देवरी तालुक्यातील पुराड्याची मुलगी व फुटांना येथील ढिव्हर समाजातील मुलाचा जाती रीती रिवाजाप्रमाणे साक्षगंध झाला.आणि त्यांचा लग्नसोहळा मे 2020 मध्ये ठरला.परंतु कोरोना प्रादूर्भाव पसरल्याने लाकडाऊन परिस्तिथी निर्माण झाल्यामु वधुपक्षाकडील मंडळींनी लग्न दिवाळीनंतर करण्याचे ठरविले.
त्यातच काही दिवसापूर्वी मुलाच्या आईचे निधन झाले.त्या कार्यक्रमात मुलीचे आई वडील आले असता लग्न झाले असते तरी सुनेला मुलाच्या आईने बघितले असते अशा चर्चा रंगल्या.त्यावर मुलीला हे बोलले न पटल्याने कार्यक्रमानंतर मामाच्या नकटी गावाला जातो असे आईवडिलांना सांगून निघाली आणि शनिवारला मुलासोबत पळून जाऊन आज रविवारला देवरीतील धुकेश्वरी मंदिरात दोघांनीही येत लग्न केले