तू बुद्ध शरणमे आजा अपने उद्धार के लिए!

0
10

गोंदियात बुद्ध जयंती उत्साहात

गोंदिया ता.27:-तथागत भगवान बुद्धांच्या 2587 व्या जयंती निमित्त आयोजित संगीतमय मैफलने वाहवाही लुटली.तू बुद्ध शरणमे आजा अपने उद्धारके लिए या सादर करण्यात आलेल्या गीतामुळे संपूर्ण वातावरण बुध्दमय झाले.राजस्थान येथील भरतपूरच्या बहुजन मिशनरी गायिका निशा बौद्ध यांनी हे गित सादर केले.त्यांनी भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ सादर केलेले तेरे संविधान मे जो शक्ती हैं, मै शिष झुकाये जाती हुं! या गाण्यावर श्रोतेमंडळी भावविव्हळ झाली होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील भीमनगरच्या मैत्रियबुद्ध बुद्ध बिहाराच्या मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तत्पूर्वी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जगमे बुद्ध का नाम हैं येही भारत की शान हैं!
आदि घोषवाक्यानी गोंदिया नगरी दुमदुमून गेली. संपूर्ण वातावरण बुध्दमय झाले होते. येथील भीमनगरच्या मैदानावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गेंदलाल तिरपुडे यांनी पंचशील झेंडा दाखवून रॅली प्रस्थान करण्यात आली.या रॅली मध्य मोठ्यासंख्येने कार, बाईक आणि रथांचा समावेश होता.या रथांवर सजलेले धार्मिक देखावे, यामध्ये सम्राट अशोक, अंगुलीमाल यांचे बुद्धांना शरण जाणे , सुजाताने तथागताना खीर ग्रहण करण्यास देणे आदि विविध देखाव्यांचा समावेश होता. मिरवणुकीत सर्वांनी परिधान केलेले शुभ्र वस्त्र आणि पंचशील झेंडे यांचे आकर्षण ठरलं !
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने या दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दरम्यान नागपूरचे भदंत डॉ धम्मज्योती महाथेरो आणि भदंत नागदीपांकर यांनी धाम्मोपदेश दिला. ते म्हणाले की, देशात विषमतामय वातावरण डोके वर काढत असून भारताला बुद्धांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे.युनियन पब्लिक सर्विस कमिसनच्या परीक्षेत गोंदियातील प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.