मोहाडी,दि.17ःपालोरा गावाची ३००० हजार लोकसंख्या असून चार ते पाच महिन्यापासून आरोग्य सेविका नाही. आरोग्य विभागाकडून अजुनही नव्या परीचारीकेची सेविकेची नियुक्ती करण्यात आली नाही. पालोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला परीसरातील गावे जोडलेले आहेत. तातडीने नव्या आरोग्य सेविकेची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पालोरा बाजारपेठेचे गाव असुन येथील नागरीकांना करडी येथील आरोग्य केंद्रात जावे लागते. परंतु रात्रीच्या वेळी एखाद्याची प्रकृती बिघडली किंंवा महिलेला प्रसुती करीता गरज पडली तर करडी किंवा भंडारा येथे न्यावे लागते. परंतू त्यावेळी वाहन व्यवस्था मिळाली नाही तर त्या व्यक्तीला घरीच जीव गमवावा लागतो. गावातील नागरीकांना एखाद्या गोळीची गरज भासली तर तीही मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.आरोग्य विभागाला आरोग्य सेविकेची माहिती असतांनाही पालोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सेविकेची नियुक्ती करण्यात येत नाही. सदर गैरप्रकार हा पालोरा ग्रामवासीयावर अन्याय करणार आहे. पालोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका नाही. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना सांगण्यात आले. मात्र अधिकारी म्हणतात, आरोग्य सेविका मरस्काल्हे यांची नियुक्ती केली आहे. परंतु अजुनही पालोरा उपकेंद्रात मरस्कोल्हे आरोग्य सेविका रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे पालोरा आरोग्य उपकेंद्र वाèयावर चालत आहे. तरी तात्काळ पालोरा उपकेंद्रात सेविकेची नियुक्ती करण्यात यावी व सेविकेला मुख्यालयी राहण्यास सांगावे, जेणेकरून पालोरावासियांना त्यांचा फायदा होईल, अशी मागणी पालोरा येथील ग्रामपंचायत सदस्य भोजराम तिजारे यांनी केली आहे.