गडचिरोली शहरातील 53 कोरोना बाधितांसह जिल्हयात 114 बाधित

0
200

गडचिरोली : दि. 18 ऑक्टो – आज गडचिरोली शहरातील नवीन 53 कोरोना बाधितांसह जिल्हयात 114 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. आज 101 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4546 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3671 वर पोहचली. तसेच सद्या 839 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 36 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.46 तर मृत्यू दर 0.79 टक्के झाला.

आज कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 31, अहेरी 6, आरमोरी 22, भामरागड 3, चामोर्शी 5, धानोरा 6, एटापल्ली 18, मुलचेरा 0, सिरोंचा 4, कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली 53, अहेरी 10, आरमोरी 1, भामरागड 3, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 5, कोरची 0, कुरखेडा 9, मुलचेरा 3, सिरोंचा 5 व वडसा येथील 16 जणांचा समावेश आहे.

यामध्ये गडचिरोली 53 मध्ये आनंदनगर 1, रेड्डी गोडावून मागे 3, सीआरपीएफ 1, शहरातील इतर 4, लांझेडा 1, मच्छी मार्केट जवळ 1, रामनगर 6, सुभाषचौक 1, आशिर्वादनगर 1, आयोध्यानगर 1, आनंदनगर 1, पोलीस स्टेशनमागे 1, कॅम्प एरिया 3, चामोर्शी रोड 1, कलेक्टर कॉलनी 1, डोंगरगाव 1, फुले वार्ड 2, गोकूळनगर 2, कारगिल चौक 1, कारवाफा 1, नवेगाव 4, मेडिकल कॉलनी 2, पोलीस कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 7, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, त्रिमुर्ती चौक 1, वनश्री कॉलनी 1, वीर बाबुराव शेडमाके 1 व वंजारीवार्डातील 1 जणाचा समावेश आहे.

इतर तालुक्यांमध्ये अहेरी 10 मध्ये आलापल्ली 1 व शहरातील इतर सर्व, आरामोरी 1 मध्ये शहरातील, भामरागड 3 मधील सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 7 मध्ये गायत्रीनगर 1, आष्टी 1, घोट 1, कोनसरी 1कुरूड 1 व वायगाव 2 जणांचा समावेश आहे. धानोरा 2 मध्ये शहर 1 व 1 जण झरीचा आहे. एटापल्ली 5 मध्ये जारावंडी 1, हालेवाडा 1 व स्थानिक 3 जणांचा समावेश आहे. कुरखेडा 9 मध्ये स्थानिक 3, खरामटोला गेडाम हॉस्पीटल 1, गोठणगाव 1, कुंभीटोला 1, मरळ 1, नान्ही 1 व सावरखेडा येथील 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा 3 जण लगाम येथील आहेत. सिरोंचा 5 मध्ये सर्व स्थानिक आहेत. वडसा येथील 16 मध्ये सीआरपीएफ 2, कन्नमवार वार्ड 3, आमगाव 3, मधुबन कॉलनी 1, एक्कलपूर विसोरा 2, हनुमान वार्ड 2, कींबाडा 1, नैनपूर 1 व सावंगी येथील 1 जणाचा समावेश आहे.