PMO ने घेतली नागपूरकरांच्या पत्राची दखल;’क्रेडीट शेल’धारक असंख्य ग्राहकांना दिलासा

0
350

नागपूर, १८ : कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकिटांची रक्कम परत मिळण्यासाठी नागपूरचे हरिहर पांडे यांनी PMO सोबत सतत पत्रव्यवहार केला होता.याप्रकरणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष देण्याची विनंती केली होती. त्या पत्राची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेतल्या गेली, हे महत्वाचे.हरिहर पांडे यांना १६ तारखेला PMO मार्फत मिळालेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले की, “मा. सुप्रीम कोर्टाच्या 1-10-2020 च्या निर्देशानुसार 7-10-2020 रोजी DGCA च्या परिपत्रकात Refund संदर्भात बाबी दिलेल्या आहेत.” या आदेशांचा क्रमांकसहीत उल्लेख पत्रात नमूद करण्यात आलेला आहे. हा संदर्भ घेऊन लॉकडाउनमुळे 25 मार्चपासून आतापर्यंतच्या रद्द झालेल्या सर्वच विमान तिकीटांचे ‘क्रेडिट शेल’मध्ये असलेले पैसे परत मिळू शकतात. या पत्रामुळे असंख्य ग्राहकांना दिलासा मिळणार असून हरिहर पांडे यांनी PMO चे आभार मानले आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालय, नागरी उड्डयन महासंचालनालयानंतर पंतप्रधान कार्यालयानेही Refund संबंधी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या नावाखाली विमान कंपन्या ग्राहकांना Credit Shell चे गाजर दाखवून अडवणूक करीत होती. वरील पत्रामुळे विमान कंपन्याच्या हेकेखोरपणाला चाप बसणार असून ग्राहकांची लूट थांबण्याची शक्यता आहे. आता विमान कंपन्यानी हे आदेश पाळावेत, अशी अपेक्षा क्रेडीट शेलधारक मंडळी बाळगुन आहेत.

चौकट…
कोरोनामुळे रद्द झालेल्या विमान तिकिटांची रक्कम परत मिळण्यासंदर्भात PMO मार्फत नागपूरचे हरिहर पांडे यांना 16-10-2020 रोजी महत्वपूर्ण संदेश पाठविला आहे, त्यातील महत्वाचा भाग…Please refer DGCA circular 4/1/2020-IR dated 07/10/2020 on the subject Refund on cancellation of air tickets during lockdown on the basis of Hon’ble Supreme Court judgement passed on 01/10/2020.