बरांज कोळसा खाणीत काम बंद आंदोलन

0
283

भद्रावती=कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमी. कंपणीतर्फे तालुक्यातील बरांज कोळसा खाणीतील मशिनरीजचे मेंटन्सचे काम सुरू करण्यात आले होते. सदर काम कंपणीद्वारा सॅटेलाईट नावाच्या कंपणीला दिले आहे. मात्र मेंटनन्सचे काम सुरू असताना प्रकल्पग्रस्त व कामगारानी काम बंद पाडले व त्यांना खाण परिसरातून बाहेर काढण्यात आले.
खाणीत असलेल्या मशिनरीजचे मेंटेनन्स गेल्या बुधवारपासून सुरू झाले होते. यावेळी तिथे काम करणार्‍यांना विचारले असता तहसीलदारांची परवानगी असल्याचे सांगितले मात्र तहसीलदार यांना विचारणा केली असता तहसील कार्यालयातर्फे कोणतीही परवानगी दिली गेली नसल्याचे सांगण्यात आले, असे कामगार नेते राजू डोंगे यांनी सांगितले.
बरांज कोळसा खाणीतील कोणत्याही प्रकारचे काम चालू करण्याआधी प्रकल्पबाधित गावकर्‍यांच्या व तेथील कामगारांच्या मागण्यांचे निराकरण करण्याबाबतची भूमिका प्रकल्पग्रस्त व कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या या कोळसा खाणीत कोणतेच काम होवू न देण्याची रणनीती सुरू आहे. दूसरीकडे कंपनी सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे येत्या काळात कंपणीविरुध्द कामगार व प्रकल्पग्रस्त असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावेळी कामगार नेते राजू डोंगे, विशाल दुधे, दिनेश वानखडे, संजय ढाकणे, रामदास मत्ते, राजगोपाल जयरामन, प्रभाकर कुळमेथे, नितीन चालखुरे, अमरदीप मशाखेत्री, संजय आसुटकर व इतर कामगार उपस्थित होते.