मुदत संपणाऱ्या नगरपरीषदांचा प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित

0
392

भंडारा दि. 21 : भंडारा जिल्हयातील मोहाडी, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 3 नगरपरीषद मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 21 ऑक्टोंबर ते 24 डिसेंबर 2020 या कालावधीत तीन टप्यांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे.

 पहिल्या टप्यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मुख्याधिकारी 21 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करतील. 29 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी प्रस्तावास मान्यता देतील. 3 नोव्हेंबर 2020 रोजी सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटिस (जिल्हाधिकारी व नगरपरिषद व नगरपंचायतीच्या वेबसाईटसह) प्रसिध्द करण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर 2020 रोजी नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्यामध्ये 18 ते 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणाची रहिवास्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागविण्याकरीता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 4 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी सुनावनी करतील. 10 डिसेंबर 2020 रोजी हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. 17 डिसेंबर 2020 रोजी संबंधित विभागीय आयुक्त अंतीम प्रभाग रचनेस मान्यता देतील.

तिसऱ्या टप्यामध्ये अधिनियमातील कलक 10 नुसार अंतीम अधिसुचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या वेबसाईटवर 24 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.