गडचिरोली दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूंसह 108 नवीन बाधित, तर 119 कोरोनामुक्त

0
207

गडचिरोली,,दि.22: कोरोनामुळे दोन मृत्यूंसह जिल्हयात 108 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4973 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4124 वर पोहचली. तसेच सद्या 806 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 43 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 2 मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील 45 वर्षीय पुरूष व डोंगरगाव मधील 65 वर्षीय उच्चरक्तदाब पीडीत पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.21 टक्के तर मृत्यू दर 0.86 टक्के झाला.

नवीन 108 बाधितांमध्ये गडचिरोली 44, अहेरी 16, आरमोरी 12, भामरागड 1, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 4, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 5, सिरोंचा 10 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 119 रूग्णांमध्ये गडचिरोली 49, अहेरी 6, आरमोरी 15, भामरागड 0, चामोर्शी 7, धानोरा 6, एटापल्ली 9, मुलचेरा 0, सिरोंचा 5, कोरची 2 व कुरखेडा 10 मधील 10 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 44 मधे साई ट्रेडर्स समोर 1, माळ रोड 1, पोटेगाव 1, आशिर्वाद नगर 1, इतर जिल्हा 5, आयोध्या नगर 1, साईनगर 1, कॅम्प एरिया 4, सीआरपीएफ 3, गोकुळनगर 2, गुलमोहर कॉलनी 2, आयटीआय चौक 2, कन्नमवार वार्ड 1, कातली 1, एमआयडीसी कॉलनी 1, नवेगाव 1, मच्छी मार्केट जवळ 3, पंचवटीनगर 1, पारडी 5, पोटेगाव आश्रमशाळा 1, रेव्हून्यू कॉलनी 1, स्नेहा नगर 1, एसपी कार्यालय 1, तुकडोजी चौक 1 व विसापूर येथील 1 जणाचा समावेश आहे.

कोरची मधील बेडगाव कोरची मधील 1 जण आहे. कुरखेडा मधील 3 मध्ये पिंपळगाव, चिखली व स्थानिक एक एक जण बाधित मिळाले. मुलचेरा 5 मधील पीएचसी सुंदरनगर, विजयनगर1, कोडीगाव 1 व स्थानिक 2 जण आहेत. सिरोंचा 9 मध्ये 8 सीआरपीएफ झिंगनूर व 1 आरोग्य विभागातील आहे. वडसा 4 मध्ये 2 सीआरपीएफ व 2 स्थानिक आहेत. अहेरी 16 मध्ये 4 आलापल्ली, धमरेंचा 1, स्थानिक 10 व सीआरपीएफ 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी 12 मध्ये 1 दलानवाडी, 11 स्थानिक आहेत. भामरागड मधील 1 ताडगावचा आहे. चामोर्शी 8 मध्ये 6 आष्टी येथील, कुनघाडा 1 व रामाला 1 जण आहे. धानोरा मधील 1 जण स्थानिक आहे. एटापल्ली 4 मध्ये 1 हेटलकसा व बाकी स्थानिक आहेत.