सालई खुर्द : या वर्षी कोरोनाचे संकट नंतर महापूर व आता धान पिकांवर मावा तुडतुड्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या वर्षी उन्हाळी धानपिकाला बावनथडी धरणाचे पाणी देण्यात यावे जेणे करून या संकटातून शेतकरी कसातरी सावरेल त्यासाठी मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, पालडोंगरी, बपेरा, सिहरी, टांगा, उसर्रा, रामपूर गावातील शेतकरी यांनी तुमसर रामटेक मार्गावर रास्तारोको करण्यात आला. दरम्यान तुमसर पोलीस उपविभागाचे संतोष बिसेन, आंधळगावचे पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे, तुमसरचे पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार आपला ताबा घेऊन उपस्थित होते. आंदोलनकर्त्याना माजी आमदार चरण वाघमारे व सर्व पक्षीय लोकांनी भेट दिली व रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. माजी आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलनाला भेट दिली असता मध्यस्थी काढण्याचा मार्ग काढला. त्यादरम्यान मात्र बावंनथडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन वरिष्ठांना भ्रमणध्वनी वरून शेतकऱ्यांशी चर्चा केली.येत्या तीन दिवसात निर्णय घेऊ असं लिखित आश्वाशन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.या आश्वाशना नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतला असला तरी येत्या तीन दिवसात बावनथडी प्रकल्प अधिकारी यांनी या वर निर्णय घेतला नाही तर पुन्हा दि. २७ रोजी मंगळवार ला रस्त्यावर उतरू आंदोलन करण्याचा इशारा समस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
————————————–
बावंनथडी प्रकल्प साठवणूक क्षमता २८०.२४ मिलीयन मिटर क्यूब असून आज घडीला जिवंतसाठा २७१.५८५ मिलियम आहे. ५०० हेक्टर धाना करीता ६.२५ मिलीयन मिटर क्यूब पाण्याची गरज असते, ही रास्त मागणी आम्ही करीत आहोत, उर्वरित पाण्याचे इतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मायक्रो नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा.
प्रा.डॉ. सुनील चवळे
उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी केलं आंदोलन
◆प्रशासन तर्फे लिखित आश्वासना नंतर आंदोलन मागे, ●तीन दिवसात निर्णय लागला नाही तर पुन्हा शेतकरी रस्त्यावर