तीन कोरोना बाधितांच्या मृत्यूंसह 105 नवीन बाधित, तर 79 कोरोनामुक्त

0
295

गडचिरोली,दि.22: कोरोनामुळे जिल्ह्यात तीन मृत्यूंसह 105 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तसेच आज 79 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5078 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4181 वर पोहचली. तसेच सद्या 850 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 46 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन तीन मृत्यू मध्ये एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथील 40 वर्षीय पुरूष, गडचिरोली येथील रामनगर मधील 61 वर्षीय पुरुष आणि सावली जिल्हा चंद्रपूर येथील हिरापुर मधील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.36 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.74 टक्के तर मृत्यू दर 0.91 टक्के झाला.

नवीन 105 बाधितांमध्ये गडचिरोली 64, अहेरी 10, आरमोरी 2, भामरागड 3, चामोर्शी 5, धानोरा 4, एटापल्ली 6, कोरची 2, कुरखेडा 4, मुलचेरा 1, सिरोंचा 00 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 79 रूग्णांमध्ये गडचिरोली 23, अहेरी 6, आरमोरी 17, भामरागड 3, चामोर्शी 7, धानोरा 7, एटापल्ली 5, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 6 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64 बाधितामध्ये अयोध्यानगर येथील 1, सुभाष वार्ड 1, मेडिकल कॉलनी 2, स्थानिक 4, पीएचसी पोर्ला मधील 1, माडेतुकूम 1, टिचर कॉलनी 1, गोकुल नगर 7, मुरखडा 2, अलहद नगर 1, धनवंतरी हॉस्पिटल 1, सुभाष वार्ड 1, नवेगाव 3, सोनापुर कॉम्पलेक्स 2, बट्टुवार कॉम्प्लेक्स 2, आयटीआय चौक 1, रामनगर 2, आरमोरी रोड 1, सर्वोदय वार्ड 3, शिवाजी नगर 1, झेडपी कॉलनी 2, पारडी 3, धुंदेशिवनी 1, आर्मी चौक 1, गांधी वार्ड 1, कारगील चौक 3, कॉम्प्लेक्स 1, साकरा 1, पोलीस स्टेशनच्या मागे 1, वनश्री कॉलनी 1, संताजी नगर 1, गुरवळा येथील 1 जणाचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये चितेकन्हार पो. गिलगाव येथील 1, करडुड घोट येथील 1, स्थानिक येथील 3 जणाचा समावेश आहे.
कोरची मधील स्थानिक 2 जणाचा समावेश आहे. कुरखेडा येथील बाधितामध्ये कढोली येथील 1, पुराडा 1, रामगड 1, सगमापुर 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा येथील बाधितामध्ये सुंदरनगर येथील 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा वडसा येथील बाधिताध्ये कोरेगाव येथील 1, विसोरा येथील 2, राजेंद्र वार्ड येथील 1 जणाचा समावेश आहे. अहेरी येथील बाधितामध्ये स्थानिक 8, पेरमिली 1, नवेगाव 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी येथील बाधितामध्ये स्थानिक 2 जणाचा समावेश आहे.
भामरागड मधील 3 स्थानिक, धानोरा बाधितामध्ये एसआरपीएफ मधील 2, दुधमाळा 1, एटापल्ली येथील स्थानिक 1, अलडांडी येथील 2, मोडसके 1, तांबडा येथील 1 तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील बाधितामध्ये 4 जणाचा समावेश आहे.