अहेरी-संगम लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत तेजस्विनी माय खानावळ ‘शिवभोजन’ केंद्राचे मंगळवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाजवळील पटवारी भवन जवळ शिवभोजन केंद्र उभारण्यात आले असून गरीब आणि गरजूंकरिता शिवभोजन थाळीचा सोय होणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, राज्य शासनाने शिवभोजन उपक्रम राज्यात राबवून गोर गरीब व कामगार मजुरांसाठी चांगली सोय उपलब्ध करून दिले. ग्रामीण व खेड्यापाड्यातील तालुकास्थळी अवागमन करणार्या नागरिकांसाठी शिवभोजन उपयुक्त ठरणार आहे, यामुळे कोणीही उपाशी राहू नये हाच शासनाचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, महसुलचे मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर खान पठाण, रा.काँ.चे श्रीनिवास विरगोनवार, अरुणा गेडाम व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.