आदिवासी महिलांचा पुढाकार मुंडिकोटा रावण दहन प्रथेला विरोध

0
651

तिरोडा,दि.26ः तालुक्यातील मुंडीकोटा येथे अनेक वर्षांपासून रावण दहन करण्याची परंपरा आहे. येथे मोठ्या प्रमाणात अनुसुचित जमातीचे आदिवासींचा समुदाय असून अनुसूचित जमातीमध्ये (आदिवासी) वैचारिक सुधारणा व परिवर्तन घडून येत आहे. रावण राजा, हा पराक्रमी, शूर, महान सम्राट होता. तो आदिवासी समाजाचा असून अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या जातींचे आराध्य दैवत असल्याने दरवर्षी विजयादशमीला होणार्या रावण दहन कार्यक्रमाचा समाजातील महिलांनी विरोध केला आहे.

वर्षोनवर्ष कुप्रथेचे वहन हिंदू समाजाकडून होत होते. अनुसूचित जमातीचे आदिवासी असले तरी धर्म हा हिंदूच आहे. ही विसंगती परंपरेनूसार होत होते. याचे खंडन मुंडीकोटा येथील अनुसूचित जमातीच्या आदिवासी महिलांनी कंबर कसून रावण दहणाला त्यांनी विरोध केला. रावणाचे कलाकृती पुतळ्याला घेराव घातला. आणि रावण दहनाला विरोध दाखविला. रावन दहन करणाऱ्या लोकांना समज देऊन माघारी परतवण्यात आले.यावेळी पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस चौकी प्रभारी लाला लोणकर यांचे मार्गदर्शनात रंजित भांडारकर, एनपीसी रक्षे यांनी वेळीच दखल घेऊन शांतीपूर्वक प्रकरण हाताळले. अनुसूचित जमातीच्या आदिवासी महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले.