गोंदिया- महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता वादी विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या ऊद्देशाने संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, सर्वसमाज जयंती समिती जिल्हा गोंदिया च्या वतीने 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त दि.14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान आयोजिलेल्या ऑनलाइन “बुद्ध संदेश” प्रतियोगिता उपक्रमाला राज्यस्तरीय उत्सुर्फ प्रतिसाद प्राप्त झाला. या ऑनलाइन उपक्रमा अंतर्गत बुद्ध धम्मावर आधारित प्रश्नोत्तरी, लॉकडाउन के अनुभव- मेरी आत्मकथा, कथा कथन, काव्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, गीतगायन, रंगोली-सजावट या प्रतियोगीता स्पर्धा घेण्यात आल्या. या ऑनलाइन स्पर्धेत प्रतीभागींचा राज्यस्तरीय सहभाग होता.
प्रश्नोत्तरी स्पर्धेत पुरुष वर्गात क्रमश: धनराज गमरे (मुंबई), सुरेंद्र खोब्रागडे (आमगाव), सतिश वानखेडे (जगदलपुर), महिला वर्गात लोपामुद्रा शहारे ( नागपुर), मृणालीनी दहीवडे ( नागपुर), लायन्दा लाडे, विद्यार्थी वर्गात कु. प्रियंका गणवीर ( गुदमा), आंचल उके ( नागपुर), कु.श्रद्धा खोब्रागडे क्रमश: प्रथम द्वितीय तृतीय ठरले. लॉकडाउन के अनुभव- मेरी आत्मकथा स्पर्धेत प्रथम कु.शिमॉन भालाधरे, द्वितीय कु.आंचल रामटेके, तृतीय आर्यन बनसोड, कथा कथन स्पर्धेत प्रथम कु.प्रियंका गणवीर (गुदमा) द्वितीय धनराज गमरे, तृतीय आयु.लोपामुद्रा शहारे, काव्य स्पर्धेत उमा गजभिये, द्वितीय कीरण वासनिक, तृतीय आयु लोपामुद्रा शहारे, निबंध स्पर्धेत जूनियर कैटेगरीत प्रथम सुधा गणवीर (गुदमा), द्वितीय निखिल रामटेके, तृतीय आर्यन बनसोड, सीनियर कैटेगरीत प्रथम मृणालीनी दहीवडे ( नागपुर), द्वितीय उमा गजभिये, ड्रॉइंग स्पर्धेत प्रथम श्रेया देशभ्रतार द्वितीय जय खोब्रागडे (आमगाव), तृतीय सक्षम लाऊल, गीत गायन स्पर्धेत जूनियर कैटेगरीत प्रथम मैथीली जांभुलकर, द्वितीय श्रावणी पानतोने, तृतीय शिमॉन भालाधरे, सीनियर कैटेगरीत प्रथम कीरण वासनीक, द्वितीय तामर डोंगरवार ( कटँगी कला), तृतीय सुनंदा रामटेके, रंगोली सजावट स्पर्धेत जूनियर कैटेगरीत प्रथम श्रावणी पानतोने, द्वितीय निखिल भालेराव, तृतीय सुरभी खोब्रागडे (आमगाव), सीनियर कैटेगरीत प्रथम अक्षौहिनी भिमटे, द्वितीय पंकज मेश्राम ( गिधाडी), तृतीय लोपामुद्रा शहारे ( नागपुर) या प्रमाणे विजेता ठरले.
▪️आयोजीत विविध स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारे प्रतिभागी सुनिता चंद्रिकापूरे ( नागपुर), सुकेशिनी बोरकर (ब्रम्हपुरी), तुलसा लाडे, नेहा पेंढारकर, एड. पंकज हुमने ( लाखनी), विनिका वालदे ( दासगाव), स्नेहा मेश्राम ( ढाकणी), अलीशा चौहान ( ढाकणी), प्रणाली चौहान, मयुर शहारे ( लाखांदुर), अंगद भालाधरे , युवराज गौतम, आदित्य कठाणे, मानव कठाणे, यश देशभ्रतार, अनामिका सतदेवे ( मुंडीपार), नंदिनी बनसोड, रोहित रामटेके ( अंभोरा), विश्वरत्न सोनटक्के (हिंगोली), माधुरी गणवीर ( गुदमा), रुची बनसोड याना प्रोत्साहन पर पूरस्कृत करण्यात येईल. प्रतियोगितेच्या यशस्वीतेकरिता संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, समता सैनिक दलाचे प्रचारक महेंद्र कठाणे, सर्वसमाज जयंती समितीच्या संघटीका डॉ.दिशा गेडाम यानी अथक प्रयास केले.