माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत 47 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

0
182

गोंदिया,दि.03 :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना , प्रकल्प -गोंदिया 01 अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत सन 2019-2020 या वित्तीय वर्षांतर्गत पात्र ठरलेल्या 81 लाभार्थांपैकी 47 लाभार्थ्यांना बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्यावतीने धनादेशाचे वितरण आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते(दि.2)करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला चंद्रशेखर वाळवे,नरेश पी. सोनटक्के , बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल ए. भोसले उपस्थित होते. यावेळी एक मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या 03 लाभार्थ्यांना रुपये 50,000 /- चा धनादेश तर दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या 44 लाभार्थ्यांना रूपये 25,000/- चे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित लाभार्थी पालक वर्गाला मार्गदर्शन करतांना वर्तमानकाळातील कुटुंब व्यवस्थेत मुलासह मुलींचेही महत्त्व व मुलाच्या बरोबरीने मुलींचे प्रमाण वाढविण्याचे महत्व विशद केले.बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश पी. सोनटक्के यानी केले. संचालन व उपस्थितांचे आभार तिर्थराज ते. उके यांनी मानले.यशस्वीतेसाठी  अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका अनिता भुसावळकर,माधुरी आकुलवार,शकुंतला दानवे, दयाबाई राऊत, कु. गंगासागर पंधरे, गटसमन्वयक सुजीत जांभुळकर,  संतोष बनकर, कनिष्ठ सहाय्यक  व्ही. आर. बारस्कर , परिचर क्रष्णाबाई नागपुरे यांनी परिश्रम घेतले.