राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने निदर्शने व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
183

गडचिरोली:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात यासाठी जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी इत्यादी तालुक्यातून मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष तसेच इतर मागास वर्ग मंत्रिमंडळ उपसमितीचे सर्व मंत्री सदस्यांना मा. जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्यामार्फत निवेदने पाठवण्यात आलेत.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 2016 पासून विविध प्रकारची आंदोलने, अधिवेशने यामाध्यमातून ओबीसींचे विविध प्रश्न, केंद्र व राज्य शासनापुढे रेटण्यात आले. त्यामुळेच नॉन क्रिमीलेअर ची मर्यादा प्रथम ४.५ लाखावरून ६ लाख आणि त्यानंतर ८ लाख करून घेण्यास महासंघाला यश आले. महासंघाच्या रेट्यामुळेच महाराष्ट्र शासनाला ओबीसी मंत्रालया ची स्थापना करावी लागली, आणि केंद्र शासनाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा लागला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दबावामुळेच मागील सरकारला जवळपास 23 प्रकारचे शासन निर्णय काढावे लागलेत. परंतु अजून बर्‍याचश्या ओबीसींच्या समस्या प्रलंबित आहेत.
यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे .मागण्यांचे निवेदन  3 नोव्हेंबर 2020 रोजी मा. जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार जिल्हा गडचिरोली यांचेमार्फत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. नानाभाऊ पटोले, इतर मागास वर्ग मंत्रिमंडळ उपसमितीचे सर्व सदस्य अनुक्रमे ना. छगन भुजबळ, ना. विजय वडेट्टीवार, ना. जितेंद्र आव्हाड, ना. संजय राठोड ना. गुलाबराव पाटील तसेच सर्व मंत्री, आमदार व मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाराव चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव देवानंद कामडी, गाणली समाजाचे सचिव रवींद्र आईतुलवार, संताजी सोशल मंडळाचे सुरेश भांडेकर, माळी समाजाचे सुखदेवजी जेंगठे, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर, पुरुषोत्तम मस्के, सुरेश लडके, राजेंद्र उरकुडे, गोविंदराव बानबले, रामकृष्ण ताजने, भास्कर नागपुरे, भास्कर मस्के, विठ्ठल कोठारे, प्राचार्य सागर म्हशाखेत्री, शरद निंबाळकर, खेमराज भोयर, क्रांतीक भोयर, हरिदास कोटरंगे, रमेश जेंगठे, प्राचार्य राजेंद्र लांजेकर आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.