बिरसी विमानतळ प्राधिकरणाने चालविला शौचालयासह घरावर बुलडोजर

0
354

गोंदिया=तालुक्यातील बिरसी येथील विमान प्राधिकरणच्यावतीने गट नं. ३0९ वरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम (ता.४) सुरू करण्यात आली. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या गट क्र. ४0 ते ५0 कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून राहत आहेत. मात्र त्यांची न ऐकता प्राधिकरणाच्यावतीने त्यांना बेघर करण्याचा षडयंत्र रचण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अतिक्रमण काढत्या वेळी नागरिकांचा रोष बघता ही मोहीम थांबविली असली तरी प्राधिकरणाचा बुलडोजर त्या कुटुंबीयांच्या आवार भिंत व शौचालयावर चालला. या प्रकारामुळे बिरसी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय विमान प्राधिकरणाच्यावतीने बिरसी येथे हवान प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. यासाठी या पूर्वीही आवश्यक ती भूमी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यातच गावालगत असलेल्या गट क्र. ३0९ मध्ये अनेक वर्षांपासून ४0 ते ५0 कुटुंबीयांचे वास्तव्य आहे, ती जागा प्राधिकरणाला हवी आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्राधिकरणाने परवानगी घेतली. मात्र त्या कुटुंबीयांनी आमचे आदी पुनर्वसन करा, अशी भूमिका घेतली होती. तसेच प्रशासन व स्थानिक ग्राम पंचायत आपल्याशी भेदभाव करीत असल्याचा आरोपही काही दिवासांपूर्वी आयोजित पत्र परिषदेत केला होता. मात्र त्या कुटुंबीयांची न ऐकता (ता.४) अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त निश्‍चित केला. सकाळी प्राधिकरणाच्यावतीने बुलडोजर गावात पोहचून कारवाईला सुरुवात होताच महिला व पुरुषांनी त्या बुलडोजरची वाट अडवून धरली व विरोध केला. नागरिकांचा विरोध पाहून विमान प्राधिकरणाने घर पाडण्याचे थांबविले मात्र बुलडोजर आवार भिंत व शौचालयावर चालवून आपला मुजोरपणा केला. तसेच ही कारवाई पूर्ण करण्यात येणार, अशी दमदाटीही त्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.