भंडारा,दि.05ः-भंडारा येथील माजी नगरसेवक व सिनेट सदस्य राहिलेले काँग्रेस नेते महेंद्र निंबार्ते यांनी बुधवार(दि.4)नागपूर येथे आयोजित बैठकित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.एैन जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष सोडल्याने भंडारा जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्यासोबतचे मतभेद पक्षसोडण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.निंबार्ते यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,माजी मंत्री व आमदार डाॅ.परिणय फुके,खासदार सुनिल मेंढे यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.