डीआयजींनी घेतला सुरक्षेचा आढावा

0
336

धानोरा=नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे तैनात असलेल्या ११३ वाहिनी सीआरपीएफचे पोलिस उप महानिरीक्षक मानस रंजन यांनी ११३ वाहिनी मुख्यालय धानोरा व येरकड येथे तीन दिवसांचा दौरा करून सुरक्षेचा आढावा घेतला.
या दौर्‍यादरम्यान डीआजी मानस रंजन यांनी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कर्तव्य बजावित असताना सतर्कता बाळगणे, नागरिकांना सहाय्यता करून त्यांची मने जिंकणे, कोरोना महामारीपासून आपला बचाव करावा आदी बाबत मार्गदर्शन केले. रेव्हन्यु कॉलनी कॅप्म परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी ११३ वाहीनी धानोरा येथील मुख्यालयात सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान डीआजीने सर्व जवानांसोबत भोजन केला. जवानांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांचे मनोबल वाढविले.
यादरम्यान ११३ वाहीनीचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ, द्वितीय क्रमान अधिकारी राजपाल सिंग, उप कमांडंट ए. के. अनस, प्रमोद सिरसाठ यांच्यासह सर्व अधिनस्त अधिकारी व जवाना उपस्थित होते.