सातबाèयावर खसरा नोंदीचे काम ३ दिवसात पूर्ण होणार

0
510
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा-आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकèयांना धान विकण्यासाठी खसèयाची नोंद असलेल्या अद्ययावत ऑनलाईन सातबारा अडचण येत्या तीन दिवसात दूर होऊन शेतकèयांचा त्रास संपेल अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांना घेऊन जिल्हाधिकाèयांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑनलाईन सातबारा वर खासèयाची नोंद नसल्याने शेतकèयांना धान खरेदी केंद्रावर धान विक्री करताना येत असलेल्या अडचणीच्या संदर्भात विशेषत्वाने चर्चा केली गेली. केंद्रावर धान्य विकण्यासाठी ऑनलाईन सातबारा ची आवश्यकता असते. या सातबारावर २०२०-२१ चा खसरा अद्ययावत नोंद असणे अपेक्षित आहे. त्याशिवाय स्वीकारले जात नाही. आतापर्यंत खसरा अध्यावत करण्याचे काम केवळ ४२ टक्के झाले असल्याने शेतकèयांना अडचणी येत होत्या.

कामाची गती वाढवून पुढील तीन दिवसात ते काम पूर्ण करावे व शेतकèयांना होणारा त्रास दूर करावा असे निर्देश खासदार मेंढे यांनी या बैठकीत दिले. जिल्हाधिकाèयांनी तीन दिवसात शंभर टक्के नोंदी चे काम पूर्ण करू असे सांगितले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर सातबारा अडचण आता दूर होणार आहे. कीड, परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे. अशा प्रत्येकाला पीक विम्याचा लाभ कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश खासदारांनी यावेळी जिल्हाधिकाèयांना दिले. जिल्ह्यातील पिंपळगाव सडक,कोसरा या सारख्या मोठ्या गावांमध्ये अजूनही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

ही परिस्थिती लक्षात घेता यादृष्टीने कामाला गती देऊन नव्या शाखा स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीची नेमकी आकडेवारी शासनाला पाठवून पुर पिढीताना देय असलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचावी सूचनाही खासदारांनी यावेळी केली. जिल्ह्यातील इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली . बैठकीला अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.