कापड दुकानाला आग,लाखोचे नुकसान

0
1013

गोंदिया,दि.07ः गोंदिया शहरातील खोजा मस्जिद परिसरात असलेल्या कापडाच्या एनडी टेक्सटाइल शो रुमला आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज(दि.07)आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.दुल्हा हाऊस नावाने प्रसिध्द असलेल्या या दुकानात असलेले लाखो रुपयाचे सुट जळून खाक झाले आहेत. सदर दुकानात आग कशी लागली याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नसून अग्निशमन विभागाच्या दमकलने आग आटोक्यात आणली.यावेळीही अरुंद रस्ताच्या त्रास अग्निशमन विभागाच्या वाहनाला  सहन करावा लागला.